जिजाऊ भवनात रंगली शब्द प्रभूची काव्य मैफिल

32

✒️छत्रपती संभाजी नगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

छत्रपती संभाजी नगर(दि.7जून):- काळीज माझं साहित्य सामाजिक संस्था छत्रपती संभाजी नगर ही कार्यरत असणारी नवोदित साहित्यिकांना विचारपीठ मिळून देणारी एकमेव संस्था असून विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

पहिले सत्र असे पार पडले दुसरे सत्र राज्यातील अनेक भागातून आलेले कवी कवयित्री 65जणानी सहभाग नोंदला असून  डॉ लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा येथील या मान्यवरांनी रंगू रानात रंगली ही रचना सादर करू रसिकांच्या मनात घर करून बसलेली रचना टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले असून कवी विजयकुमार पांचाळ यांच्या कविते तर मंत्रमुग्ध करून तन मन बोलू लागली होती कवयत्री लेखिका संपादक सामाजिक कार्यकर्त्या जयश्री सोनवणे यांनी स्री जीवनाची होणारी काहली वैचारिक मार्मिकपणे अन् परखडपणे मांडली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात चाललेली खलबते शांत झाली असाह्य वेदना सहन करत अन्यायाला खतपाणी न चालता लढले पाहिजे.

रडले नाही पाहिजे असा सारांश कवितेत होता दिलीप परदेशी यांनी कवितेतून समाजप्रबोधन घडविले गुलाबराजा माळी बहारदार दमदार गीत गावू रसिकांंची मने जिंकली या संमेलनाचे अध्यक्ष प्रा चंद्रकांत वानखेडे यांनी भूषविले असून प्रमुख पाहुणे रज्जाक शेख डॉ सुशिल सातपुते माणिकराव गोडसे डॉ शरद म्हंकाळे सुनिता कपाळे विजय पाटील दीपक नागरे वैशाली कंकाळ अर्चना राहुरकर मंगला वाघमारे महानंदा केंद्रे बालकवी निखिल सोनवणे यांनी आई बापाची महती सांगणारी रचना ऐकून मन चलबिचल करून टाकले या लहान वयात संस्कारांचा धडा शिकवत असताना कवितेकडे त्यांचे पाऊल पडले काव्य क्षेत्रात नक्कीच नावलौकिक करेन अशी रचना सादर केली.

अशा या बहारदार दमदार काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून प्रत्येक कवी कवयत्रीची मनापासून प्रशंसा करून भरभरून कौतुक केले रंगतदार मैफिलात जीव ओतून त्यांनी आपले सूत्रसंचालन चोख अन् रोखठोक पणे केले.या काव्यमैफीची सांगता करताना प्रा विजय पाटील म्हणाले सर्व साहित्यिक मान्यरांनी साथ दिली तीही अशीच पुढे विचारांचा वारसा जपत शब्दांचा आरसा जपावा यांनी कार्यक्रमाचा समारोप व आभार मानले आशा प्रकारे राज्य स्तरीय कविसंमेलन संपन्न झाले.