भारत राष्ट्र समितीची(BRS) ब्रम्हपुरी विधानसभेत गुलाबी वादळ

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 8 जून ) :- देशातील तेलंगणा राज्यात शेतकऱ्याच्या सर्वांगीन विकासाचे जिवंत चित्र दिसुन येत आहेत.24 तास चांगल्या दाबाची मोफत वीज आणि पाणी, प्रत्येक सिजनला पेरणीसाठी 10 हजार रुपये मदत, शेळी पालनसाठी 75% सब्सिडी, 5 लाख रुपये किसान विमा , ट्रॅक्टर खरेदीसाठी 95% सब्सिडी अशा विविध शेतकरी योजनांच्या आधारे तेलंगणा शेतकरी हा सुखाचे दिवस बघत आहे.

अशात ब्रम्हपुरी विधानसभेतील शेतकऱ्यावर आज पर्यंत फक्त राजकारण करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी विधानसभेतील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून महाराष्ट्र शासन व प्रशासन व्यवस्थेवर प्रश्न पाडले आहे. किसान क्रांतीचे वादळ निर्माण करण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे सयोजक निहाल ढोरे यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गुलाबी वादळ आल्याचं दिसुन येत आहे.

शेतकऱ्यांचा पक्ष म्हणुन भारत राष्ट्र समितीचे ह्या कमी वेळेत ब्रम्हपुरी विधानसभेत जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारत राष्ट्र समितीचे ब्रम्हपुरी विधानसभेत 10 हजार सभासद नोंदणी करण्याचे ठरविले आहे. आणि 2024 ला लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निडणुकीसाठी सज्ज असल्याचे चित्र समोर येत आहे. भारत राष्ट्र समितीच्या प्रचारावर जोर वाढविला आहे.

भारत राष्ट्र समितीचे प्रचार यात्रेत संयोजक मायासिंग बावरी, सत्यपाल गोठे, देवनंदन ठेंगरी, अजय शेंडे, प्रविन कुथे, सतिश बनकर, गणेश बागमारे अमीन शेख, सागर सहारे, दिपक नन्नावरे, रुपेश ठाकरे, समिरसिंग भुरानी,शुभम गेडाम, क्रिष्णा खरवडे, सतिश दर्वे, अरमान पठाण इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.