प्रेमकवी विठ्ठल सातपुते यांच्या ‘पारखी’ कविता संग्रहाचे प्रकाशन

8

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जून):-प्रेम हि एक भावना आहे. त्याला व्यापक इतिहास आहे. त्याग, आदर, सन्मान, काळजी, जिव्हाळा, आपुलकी म्हणजे प्रेम असं आपण नेहमी ऐकतो. प्रेमाला कसलेही बंधन नसते. लैला मजनू आणि हिर रांझाच्या प्रेमाची अनुभूती फारच वेगळी आहे. मात्र, अलीकडच्या काळात प्रेमाची व्याख्या बदलून गेली आहे. केवळ शारिरीक आकर्षण म्हणजे प्रेम असं अर्थ रूढ होतो आहे. मालिका आणि चित्रपटांचा परिणाम झाल्याने तरूण पिढी मोबाईलच्या स्क्रिनवर प्रेम शोधू लागली आहे. परंतु इन्स्टा आणि रिल्सच्या तीस सेंकदात खरं प्रेम सापडत नाही. त्यासाठी प्रेम भावनेच्या अडीच अक्षरांची महती समजून घेतली पाहिजे. सोशल माध्यमाच्या आहारी जावून प्रेम समजणार नाही. त्यासाठी खरखुरी अनुभूती घ्यावी लागेल. तरच प्रेमाचा अर्थ आणि व्यापकता नव्या पिढीला समजेल, असे स्पष्ट मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मांडले.

प्रसिध्द प्रेमकवी विठ्ठल सातपुते यांच्या ‘पारखी’ कविता संग्रहाचे प्रकाशन शहरातील लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे अन्नछत्रालय येथे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिध्द कवी म.भा.चव्हाण, गझलकार नितीन देशमुख, प्रमोद खराडे, डॉ.कैलास गायकवाड, डॉ.शिवाजी काळे, डॉ.राज रणधीर, डॉ.स्नेहल कुलकर्णी, मातोश्री दगडूबाई प्रतिष्ठानचे सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ बापू सातपुते, बाबा पोले, शिवशंकर डोईजड, प्रभारी हनुमंत मुंढे, पत्रकार पिराजी कांबळे, प्रभाकर सातपुते, स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार, माणिक नागरगोजे, ॲड.अनिल सावंत होते.

कवीने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कविता लिहू नये, तर समाजात दिसते ती सत्य परिस्थिती कवीनी मांडली पाहिजे. माणसाची सुख-दु:खांना शब्द द्यायला हवेत. त्या चौकटीत कवी विठ्ठल सातपुते बसतात. ते माझे स्वीय सहाय्यक सुध्दा आहेत. अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना त्यांच्यातील कवी जागा होतो. त्यामुळे वेगवेगळ्या कवितांच्या ओळी आम्ही त्यांच्या तोंडून नेहमी ऐकत असतो. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भावना किंवा विचारांचे प्रतिबिंब पारखी या कविता संग्रहात उतरले आहेत. त्यांची ती घालमेल आणि घुसमट पारखीच्या प्रत्येक कवितेत सहज दिसते. पारखी, माणुसकी, रॉग नंबर, हुंदका, वनवा, दोन अश्रु, अमर प्रेम अशा ​सर्व कविता कवी विठ्ठल सातपुते यांना प्रेमकवी हि ओळख देतात. त्यामुळे पंचक्रोशीत त्यांच्या प्रेम कवितांशी नाते सांगणारे श्रोते आहेत. त्यांच्यातला कवी असाच फुलत आणि बहरत जावा, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.

याप्रसंगी बोलताना कवी विठ्ठल सातपुते म्हणाले की, ठरवून कधीच कविता लिहिता येत नाही. त्यासाठी अनुभूती असावी लागतो. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संदर्भ घेवून कविता लिहिताना गावाशी नातं अधिक घट्ट होते. तारूण्याच्या उंबरठ्यावर आपले अनुभव मांडताना शब्दांची सोबत होती, म्हणून मनातलं सारं मांडता आले. आयुष्यात आलेल्या कडू-गोड आठवणींना उजाळा ​देता आला. लिहिलेल्या कवितेवर निरक्षर आईने खूप प्रेम केले. त्यामुळे कवितांची वही घेवून गावोगावी फिरताना आनंद वाटायचा. कवितेने नेहमी सोबत केली. कवी म्हणून ओळख मिळाली. कौटुंबिक पाठबळ मिळाल्याने इथंपर्यत प्रवास करता आला.

यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, सचिन महाजन, वैजना​​थ टोले, इंतेसार सिद्दीकी, इकबाल चाऊस, खालेद शेख, सचिन नाव्हेकर, संजय पारवे, सतिश घोबाळे, शिवाजी पवार, शाम ठाकूर, गोपीना​थ नेजे, अभिजीत चक्के, अश्विन कदम, दुर्गेश वाघ, गणेश मिजगर, शिवशंकर मुंढे, बालाजी मुंढे, गोविंद आवाड, जयदीप ठाकूर, गोविंद टरफले, सिध्देश्वर फड, ऋषिकेश बनवसकर यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते, कवी, गझलकार, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.