दलित पँथरच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मिळाला न्याय

38

✒️सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सातारा(दि‌.9जून):- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित पँथरने सुरू केलेल्या आमरण उपोषणच्या लढ्यास अखेर न्याय मिळाला. यासंबंधी सविस्तर वृत्त असे, दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ.घनश्याम भोसले यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर संघटनेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद नंदकुमार लोखंडे यांनी म्हसवड नगरपरिषदेच्या हद्दीतील मल्हारनगर येथील वाचनालयाच्या बांधकाम मागणी केलेल्या योग्य जागेत बांधकाम सुरू करण्यासाठी दिनांक 6/03/2023 पासून म्हसवड नगर परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. न्याय दिला जात नव्हता. त्यामुळे दि. 5/4/2023 रोजी म्हसवड नगरपरिषदेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता.

त्याही वेळी लेखी पत्र देऊन देखील कोणतीही कार्यवाही केली नाही.म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आठवडा होऊनही न्याय मिळाला नव्हता.म्हणून पुढे अखंडपणे उपोषण सुरूच ठेवले होते.तेव्हा मास्टर, वाचनालयाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद नंदकुमार लोखंडे यांची वाचनालयाच्या योग्य जागेच्या प्रश्नांवर प्रखरपणे आपली बाजू मांडत असतानाच गेली सात दिवस उपाशी पोटी असल्याने अचानक बेशुद्ध होऊन त्यांची शुद्ध हरपली.

त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ. घनश्याम भोसले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातून आलेल्या पॅंथर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताबडतोब त्यांना हाॅस्पिटलला हलविले.सरतेशेवटी न्याय मागणीला न्याय दिला नाही किंवा त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका पोहचला तर दलित पॅंथर संघटना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडून म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा तसेच शासन प्रशासनाचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करेल. अशी घोषणा वरिष्ठांनी केली. तदनंतर म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करून तात्काळ सर्व मान्यता घेऊन वाचनालयाचे बांधकाम सुरू करण्यात येईल. अशा आशयाचे लेखी पत्र दिले.

त्यानंतरच प्रमोद लोखंडे यांनी ज्यूस घेऊन उपोषण सोडल्याचे जाहीर केले.यावेळी पॅॅंथर विश्वास मोरे (महाराष्ट्र उपाध्यक्ष), पॅॅंथर रोहित अहिवळे,मंगेश आवळे (युवा नेते), लक्ष्मण काकडे (जिल्हाध्यक्ष),नीता पवार (जिल्हाध्यक्षा),किरण बनसोडे (कार्याध्यक्ष सातारा),आदित्य पवार(सातारा तालुकाध्यक्ष), स्वप्नील जावळे (खंडाळा तालुकाध्यक्ष),संदीप सकुंडे (कोरेगाव तालुकाध्यक्ष),आबा सरतापे (कार्याध्यक्ष माण तालुका),भिमराव लोखंडे(जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते),महादेव सरतापे(ज्येष्ठ सामाजिक नेते), अंकुश लोखंडे(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)किरण खवळे (माजी सरपंच,शिरताव), लखन लोखंडे (युवा कार्यकर्ते),विजय तुपे (शाखाध्यक्ष, इंजबाव), नटेश्वर देवकुळे(युवा कार्यकर्ते), संतोष लोखंडे(जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते), सर्व पदाधिकारी, पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते