✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा-दि.23जुलै(जी.अहमदनगर):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एचएससी ( 12 वी) परीक्षेत बेलापूर शिक्षण संस्थेच्या जे.टी.एस. कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा 98.68 %, वाणिज्य 96.25 %, कला शाखेचा 60.58 % तर व्यवसाय शिक्षण शाखेचा 83.50 % इतका निकाल लागला आहे.
त्यामध्ये कुमारी ज्योती किसन जगताप हिने वाणिज्य विभागात 76 .30 टक्के पाडून केले यश संपादीत या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव अँड. शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची,खजिनदार हरिनारायण खटोड,जे. टी. एस.हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष बापुसाहेब पुजारी, ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद खटोड,एम. सी. व्ही. सी. विभागाच्या अध्यक्षा श्रीमती लीलावती डावरे, सिनियर कॉलेजचे अध्यक्ष राजेश खटोड,कॉलेज प्रतिनिधी संचालक माजी सरपंच भरत साळुंके, एस. आर. के. प्राथमिक विद्यालय अध्यक्ष रविंद्र खटोड,विश्वस्त हरिश्चंद्र महाडिक,मधुकर दराडे, श्रीवल्लभ राठी,अशोक भगत, नारायणदास सिकची, सौ. प्रेमा मुथा, डॉ. सुरेश मूथा,तसेच शेखर डावरे ,शिक्षक प्रतिनिधी अनिल तायडे,यांच्यासह प्राचार्या जयश्री उंडे, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर,प्रा. अरविंद नवले यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवकवृंदाने ज्योती चे त्याचप्रमाणे तिच्या नातेवाइकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे .

महाराष्ट्र, शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED