✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.23जुलै):-मेळघाटच्या विकास हवा असेल तर मेळघाटच्या जनतेला रेल्वे मार्ग आवश्यक आहे,आणि हे रेल्वे मार्ग मुंबई-दिल्ली संप्रकित असावा,जेणे करून मेळघाटची जनता चांगल्या मोठ्या शहरांशी जोडून विकास करू शकेल असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले.

मेळघाटातून जाणाऱ्या इंग्रज कालीन अकोला-खंडवा रेल्वे मार्ग नूतनीकरणाच्या नावावर तब्बल पाच ते सहा वर्षे अगोदर काढण्यात आले, इंग्रज कालीन रेल्वे लाईन होती त्याच ठिकाणावरून नूतनीकरणासाठी व्याघ्र प्रकल्प विभागाने अडसर घालून ही रेल्वेलाईन पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने व वन्यप्राण्यांच्या हितास धोकादायक असल्याचे सांगितल्याने मागील काही वर्षापासून रेल्वेमार्गाच्या नूतनीकरणाला थांबा मिळाला होता, नुकतेच केंद्र शासनाने अकोला-खंडवा मार्ग रेल्वे मार्ग मेलाघाटातून न्यावे किंवा नाही याविषयी महाराष्ट्र शासनाला संमती मागितली असता महाराष्ट्र शासनाने पर्यावरण वव्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने मेलाघाटातून रेल्वे मार्ग काढण्यास नकार दिल्याचे माहिती आहे, मात्र मागील अनेक दशकापासून या घनदाट जंगलातून इंग्रज कालीन रेल्वे धावत होती मात्र कोणत्याही वन्यप्राण्यांची जीवित हानी झाली नाही आता जंगल कमी असताना होणार का असा प्रश्न उपस्थित होऊन ही मेळघाटच्या विकासाची गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे, मेळघाटचा विकास हवा असेल तर मेळघाटच्या जनतेला रेल्वे मार्ग आवश्यक आहे आणि हे रेल्वे मार्ग सरळ मुंबई दिल्ली संपर्कित असावा, जेणेकरून मेळघाटची जनताही चांगल्या मोठ्या शहरांशी जोडून आपला विकास करू शकेल, मेळघाटातून रेल्वेमार्ग व्हावे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी बोलताना सांगितले, तर यासाठी सरळ दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा खासदार यांनी दिली, खासदार नवनीत राणा मेलाघतातून रेल्वे मार्ग व्हावे यासाठी सुरुवातीपासून सकारात्मक भूमिकेत आहे .अकोला-. खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग मेलाघाटातून जाण्यास थांबवणे म्हणजे मेळघाटच्या विकासाला खीळ लावणे असाच त्याचा अर्थ होतो, असेही त्या म्हणाल्या,खासदार नवनीत राणा यांच्या विशेष पथकाने मेळघाटात येऊन रेल्वे मार्गाविषयी जनतेची भूमिका कोणती आहे यावर सर्वेक्षण केले असता मेळघाटची जनता ही सर्वाधिक रेल्वेमार्ग मेलाघाटातूनच व्हावे या भूमिकेत आहे, कोणत्याही परिस्थितीत रेल्वेमार्गावर मेळघाटातून आणण्यास खासदार प्रयत्नशील असल्याचेही सांगितले.

 युवा स्वाभिमान आक्रमक:-

    युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष जितु दुधाने यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे मेलाघाटातून रेल्वे मार्ग व्हावे, यासाठी संपूर्ण युवा स्वभिमान पक्ष सकारात्मक भूमिकेत असून राज्य शासनाने मेळघाट आतून रेल्वे मार्ग बनवण्यास संमती द्यावी कोणताही अडसर आणू नये अन्यथा युवा स्वाभिमान पक्ष आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाच्या भूमिकेत उतरेल, यासाठी विभागीय संपर्कप्रमुख उपेन बछले,तालुका अध्यक्ष दुर्योधन,शोहेब मेमन,मुकेश मालवीय,अर्जुन पवार,रवी शहारे,देवेंद्र टिब,तोसीप शेख, गोलू अथोटे,मनीष मालवीय,बिलाल टेलको,मधुसन जाने,वैभव बन,शिवाजी केंद्रे,मोनू मालवीय,पवन कापशीकर यांनी हि समंती दर्शविली आहे.

पर्यावरण, महाराष्ट्र, मेट्रो, राष्ट्रीय, रोजगार, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED