धक्कादायक! दोन गटात तुबंळ हाणामारी; गोळीबाराच्या घटनेत 4 जखमी

18

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.16जून):-शहरात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. यात दोन्ही गटाचे लोक अमाने सामने आले. एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. ही घटना बीड शहरातील कालीकानगर भागात शुक्रवारी रात्री 11 वाजता घडली.

घटनेची माहिती मिळताच नगर रोड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली, गोळीबार झाल्यानंतर संबंधित सर्व लोक फरार झाले . मामा-भाचे गँगचा वाद घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील कालिकानगर भागात रात्री11 च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. यावेळी एका गटाकडून गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारात चारजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान हा मामा-भाचे गँगचा वाद असल्याची माहिती समोर येत आहे. गोपाळ भिसे, मनिराम गायकवाड यांना गोळी लागली आहे. तर मारोती गायकवाड, नारायण गायकवाड या दोघांवर तलवारीचे वार करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.