

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)
बीड(दि.17जून):- मौजे बोरफडी ता जि बीड येथे शुक्रवार दिनांक १६ जुन २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय बोरफडी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड, ऊसतोड कामगार कृती समिती व एआयएम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क व अधिकार या विषयावर जनजागृती शिबिर आयोजित केले होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे सदस्य- सचिव मा.न्यायाधीश जी.जी.सोनी कार्यक्रमाचे अध्यक्ष “मा.श्री. कैलास घुगे(सरपंच,बोरफडी)प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.पी व्ही. दगडखैर(उपमुख्य विधी संरक्षक सहाय लोकअभिरक्षक कार्यालय, बीड)मा.श्री.एम. आर. बडाख(1 अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, बीड )मा.श्री.यू.व्ही. पाटील(2 रे अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, बीड , व Aim trust चे ओमप्रकाश गिरी (जिल्हा कार्यक्रम अधिकारी,) ऊसतोड कामगार कृती समितीचे निमंत्रक बाजीराव ढाकणे, बाजीराव गिरी यांची प्रमुख ऊपस्थिती होती. बालकांच्या हक्काचे हनन होऊ नये बालपण हा मुलांचा अधिकार आहे तो कोणीही हिरावून घेऊ नये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने बालकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करावी रोटी खेल पढाई प्यार! हर बच्चे का है अधिकार!! असे प्रतिपादन न्यायमूर्ती जी जी सोनी यांनी शिबिरात मार्गदर्शन करताना केले.
तसेच Aim ट्रस्टच्या वतीने गाव पातळीवर सुरू असलेल्या कामाचा आढावा जिल्हा कार्यक्रमाधिकारी ओमप्रकाश गिरी यांनी मांडला. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सर्व शासकीय विभागांनी व गावातील नागरिकांनी सजग राहून स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत न्यायमूर्ती बडाख यांनी मांडले. तसेच अवैद्य मानवी वाहतूक, व्यसनाधिनता, बालविवाह ,आरोग्य,कामगार महिलांच्या समस्या यावर न्यायमूर्ती पाटील यांनी समुदायाला मार्गदर्शन केले. ऊसतोडी साठी होणारे स्थलांतर थांबवुया व पुढची आदर्श पिढी घडवूया ! ऊसतोड कामगार यांना कायदेशीर व मोफत मार्गदर्शन मदत करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी उपसरपंच पन्हाळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कुटे , अंकुश घुगे, नवनाथ कुटे, बळीराम घुगे गावातील जेष्ट नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य ,आशाताई, अंगणवाडी ताई, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चांगदेव घुगे यांनी तर ऊसतोड कामगार कृती समितीचे बाजीराव ढाकणे यांनी सर्वांचे आभार मानले.