पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात 5350 मेट्रिक टन युरिया जिल्हयात उपलब्ध

62

🔹दोन दिवसात पुढील खेप जिल्हयात पोहचणार

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24जुलै): चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये युरियाची टंचाई जाऊ नये यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ५३५० मे.टन युरीया उपलब्ध झाला आहे.
२३ जुलै रोजी इको कंपनीचे १ हजार ५०० मेट्रिक टन, तर कृभको कंपनीचे २ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खत शहरात उपलब्ध झाले.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत आवश्यक खत पुरवठा व्हावा, यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आयुक्त स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काल मुंबई येथे यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाला प्रत्यक्ष दूरध्वनी करून जिल्ह्यातील युरियाच्या तुटवडयाबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही ते संपर्कात असून काल यासंदर्भात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून व जिल्हा यंत्रणेकडून कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांना खत मिळण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी जाणून घेतले होते.
येत्या तीन- चार दिवसांमध्ये आणखीन युरिया उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी काळजी करू नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.
यापूर्वी उपलब्ध असलेले खत शेतकऱ्यांना बांधावर थेट मिळावे, यासाठी देखील जिल्ह्यात पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली होती. यासाठी अनेक ठिकाणी बचत गटांची देखील मदत घेण्यात आली आहे. बचत गटांमार्फत कृषी निविष्ठा बांधावर पोहोचवण्याचे काम जिल्ह्यामध्ये अभिनव पद्धतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात खताचा तुटवडा जाणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सजग असून यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास पालकमंत्री यांच्या या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.