कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या विद्यार्थ्याची शेंद्रिय कृषी निविष्ठा उत्पादक शेतकऱ्याशी अभ्यास भेट

27

✒️भद्रावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भद्रावती(दि.24जुलै):-पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय गडचिरोलीचे ग्रामीण कृषी कार्यानुभव या सत्रात असलेले विद्यार्थी भुषण शंकर भरडे यांनी भद्रावती तालुक्यातील पेवरा येथील शेंद्रिय कृषी निविष्ठा उत्पादक शेतकरी तथा कृषी मित्र रविंद्र जिवतोडे यांची प्रत्यक्ष शेतात भेट घेऊन शेंद्रिय कृषी निविष्ठा बनविण्याची प्रक्रिया व शेतीपुरक व्यवसायाबाबत चर्चा केली.
या भेटीत गांडुळ खत, बायो डी कंपोस्ट, जीवामृत, दशपर्णी यासारखे जैविक खते व किटकनाश याबाबत उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर गावरान कोंबडीपालन, मच्छीपालन, मधमाशी पालन या शेतीपुरक व्यवसायाची पाहाणी करुन याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यासोबतच आंतरपीक पद्धत समजुन घेतली. त्यावेळी शेतालगतचे शेतकरी उपस्थित होते.