सायकल चालविण्यामुळे मनाची निरामय प्रसन्नता वाढत जाते — बंडोपंत बोढेकर

34

🔹सायकल स्नेही मंडळातर्फे वार्षिक पुरस्काराचे वितरण

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.24जुलै):- सायकल स्नेही मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सायकल स्नेही पुरस्काराचे वितरण नुकतेच परिश्रम भवनात करण्यात आले. शासनाच्या निर्देशाच्या अनुषंगाने सामाजिक अंतर पाळून अगदी मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . तर अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. शिवनाथजी कुंभारे ,सायकल स्नेही मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक प्रा. पारखी यांनी सविस्तरपणे करून ह्या वर्षीचा संपन्न झालेला आॕनलाईन वर्धापनदिन बाबत लेखाजेखा सादर केला. त्यानंतर २०२० चे सायकल स्नेही पुरस्कार डाॕ. प्रा. योगेश पाटील , विलासराव निंबोरकर , भोजराज कान्हेकर यांना प्रदान करण्यात आला तर सायकल स्नेही विशेष सन्मान डाॕ. शिवनाथ कुंभारे यांना प्रदान करण्यात आला. रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यास सायकल चालविणे हितकारक असल्याचे मत डाॕ. कुंभारे यांनी मांडले तर आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर सायकल चालविल्याने स्वतःमधला अहंकार नाहिसा होऊन मनाची निरामय प्रसन्नता वाढत असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी केले. सूत्रसंचालन पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले तर आभार विठ्ठलराव कोठारे यांनी मानले. ह्या कार्यक्रमाकरीता प्रमोद राऊत, अरविंद खारकर , आशुतोष कोरडे , कु. निंबोरकर आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्कार वितरण प्रसंगी डॉ. पाटील, विलास निंबोरकर, भोजराज कान्हेकर यांनी मनोगत व्यक्त करून सायकल सभासदांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासीत केले.