जमीन हक्काचे दावे त्वरीत निकलीत काढण्यात यावे

38

🔸बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी

🔹ब्रह्मपुरी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.24 जुलै):-येथील बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (B RSP) यांचा तहसील कार्यालयाला बी.आर.एस.पी.चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सुरेश माने यांच्या आदेशानुसार ब्रम्हपुरीतील तहसील कार्यालयात स्मरण निवेदन दिले. निवेदनानुसार अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्येनुसार वार्षिक आर्थिक बजेट मध्ये प्रमाणबद्ध बजेट सुनिश्चित करणे, राज्यातील जिल्हा व तहसील स्तरावर अनुसूचित जाती-जमाती विद्यार्थीकरिता निवासी वस्तीगृह निर्माण करणे व वर्तमान वस्तीगृह ही आधुनिक करावीत, तसेच लॉकडाऊन मुळे बेरोजगारांचे खूप नुकसान झाले असल्याने नव्या उद्योगातील राज्यातील नोकऱ्या ह्या 80 टक्के भूमिपुत्रांना राखीव ठेवण्याचा कायदा त्वरित करणे,तसेच सरकारी नोकरीची कमतरता बघता राज्यातील अतिगरिब कुटुंबातील पात्रतेनुसार कमीतकमी एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामाहून घेणे . तसेच राज्यातील पेसा अंतर्गत जिल्ह्यांना परिपूर्ण टक्के त्यांचा हक्क देणे व त्यांच्या जमीन – दावे बद्द्ल न्याय त्वरित निकाली लावावे.अश्या मागण्या करण्यात आल्या, निवेदन देते वेळेस बी.आर.एस.पी.चे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष प्रभुजी लोखंडे, तालुका महासचिव राजेंद्र मेश्राम, तालुका उपाध्यक्ष आनंद मेश्राम तसेच इतर हंसराज रामटेके, रोशन मेंढे , किशोर प्रधान हे उपस्थित होते.