एसीबीच्या जाळ्यात सापडलेल्या आरोपींना सशर्त जामीन मंजूर-भिसी ग्रामपंचायतचे प्रकरण

24

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.24जुलै):-शासकीय कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्याकरिता तत्कालीन ग्रामसचिव राजेश येवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसीबी पथकाने दिनांक २२ जुलै २०२० रोजी चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत हुमणे, ग्रामपंचायत भिसीचे सरपंच योगिता गोहणे व उपसरपंच लीलाधर बन्सोड यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक २३ जुलै २०२० ला सत्र न्यायालय वरोरा येथे आरोपींना हजर केले असता एसीबी पथकाने न्यायालयाकडे दिनांक २६ जुलै २०२० पर्यत पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर, दिनांक २४ जुलै २०२० रोजी एसीबी पथकाने तीनही आरोपींना वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींची सशर्त जामिनावर सुटका केली.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक २२ जुलै २०२० रोजी विस्तार अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांचेविरुद्ध तत्कालीन ग्रामसचिव राजेश येवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसीबी पथकाने ३० हजार लाचेच्या संदर्भाने, कारवाई करून तीनही आरोपितांवर चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक २८०/२०२० अन्वये गुन्हा दाखल करून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार कलम ७ व १२ नुसार कारवाई करण्यात आली. त्यानंतर दिनाक २४ जुलै २०२० ला वरोरा येथील सत्र न्यायाधीश दिपक भेंडे यांच्या न्यायालानात आरोपींना हजर केले असता चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत हुमणे यांचे अधिवक्ता अँड. शनैशचंद्र जि. श्रीरामे यांनी आरोपीची भक्कम बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला.