चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.24जुलै) रोजी 23 कोरोना बाधित

30

*२४ जुलै २०२० संध्याकाळी ९.०० वाजता*

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५९

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.२४जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५९ झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या २३ बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाच, गडचांदूर तालुक्यातील एक, चंद्रपूर महानगर क्षेत्रातील सहा व चिमूर येथील चार, घुग्घुस दोन, बल्लारपूर दोन, बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलगोडी येथील एका बाधिताचा व अॅन्टीजेन चाचणीत पुढे आलेल्या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधित ३५९ झाले आहेत. यापैकी २१४ बरे झाले असून १४५ बाधितांवर उपचार सुरु आहेत.
रात्री ८ नंतर आरोग्य विभागाने दिलेल्या संक्षिप्त माहितीनुसार पुढे आलेल्या बाधितामध्ये अँटीजेन टेस्टमध्ये दुर्गापूर परिसर येथील एक जण, तर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरात हैदराबाद येथून दाखल झालेल्या सिव्हिल लाईन परिसरातील एका नागरिकांचा समावेश असून दुसरा नागरिक हा रयतवारी परिसरातील आहे.
नागपूर येथून आलेल्या घुग्घुस शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय गोपालपुरी बालाजी वार्ड चंद्रपूर येथील आणखी दोघेजण संपर्कातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. बल्लारपूर शहरातील उत्तर प्रदेशातून परत आलेला एक नागरिक व अन्य संपर्कातून पुढे आलेल्या दोघांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे. उशिरा आलेल्या या १० पॉझिटिव्ह अहवालामुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५९ झाली आहे.
चंद्रपूर शहरात आढळलेल्या दोन बाधितांमध्ये शहरातील रहमत नगर येथील ५२ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. श्वसनासंदर्भातील गंभीर आजारातून खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला २२ जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. अन्य बाधित हे अंचलेश्वर गेट परिसर येथील रहिवासी असून ७२ वर्षीय या गृहस्थाला श्वसनासंदर्भात गंभीर आजार होता. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
चिमूर तालुक्यातील ४ बाधित पुढे आले आहे.यामध्ये महाडवाडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या तीन कामगारांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. हे तीनही कामगार चेन्नई येथून जिल्ह्यात परतले होते.
तालुक्यातील चौथी पॉझिटिव्ह २५ वर्षीय युवती असून चिमूर येथील गुरुदेव वार्डातील रहिवासी आहे. मुंबईवरून आल्यानंतर संस्थात्मक कारण टाईम असणाऱ्या युवतीचा नमुना २२ जुलै रोजी घेण्यात आला होता. आज तीचे स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.
अंबुजा कंपनीच्या ट्रकमधून प्रवास करून उदगीर लातूर येथून परत आलेला ३२ वर्षीय गडचांदूर येथील युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
उर्वरित पाच जण मुल येथील राईस मिलशी संबंधित असून सरासरी २५ वयोगटातील आहे. यासोबतच आत्तापर्यंत बिहारमधून आलेल्या राईस मिलच्या २४ कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील झीलगोडी येथील ३२ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. रानबोथली परिसरातील संपर्कातून हा युवक पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.