रेशन दुकानदार व गॅस एजन्सीसाठी बँक सुविधा

    44

    ✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

    नंदुरबार(दि.25जुलै):-नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा शहरात असलेल्या सर्व बँकांची आस्थापना कार्यालयीन वेळेत अंतर्गत कामकाज, सरकारी भरणा, स्वस्त धान्यन दुकान भरणा व गॅस एजन्सी, पेट्रोलपंप धारकांची रोख रक्कम व आरटीजीएस व्यवहारासाठी सुरू राहील. इतर बँक ग्राहकांसाठी व्यवहार बंद राहतील. ग्रामीण भागातील सर्व बँक शाखा नियमीत वेळेनुसार शासनाने कोविड संदर्भात निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सुरू ठेवावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.