महाड पत्रकारीतेचा वटवृक्ष कोसळला, विजयसिंह जाधवराव यांचे निधन

15

✒️ आदेश उबाळे(श्रीगोंदा, तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.25जुलै):-पत्रकारीता क्षेत्राचे गुरवर्य भिष्माचार्य, दै.शिवतेजचे संस्थापक संपादक आदरणीय जेष्ठ पत्रकार विजयसिंह जाधवराव यांचे आज महाड येथे हृदय विकाराने दु:खद निधन झाले. पत्रकारीतेचा हा वटवृक्ष कोसळल्याने महाड मध्ये शोककळा पसरली आहे.
दै.शिवतेजचे संस्थापक संपादक, तसेच नवयुग विद्यापिठचे संस्थापक जेष्ठ पत्रकार विजयसिंह जाधवराव यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी महाड येथील राहत्या घरी हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाडची पत्रकारीता पोरखी झाली आहे. पत्रकारीतेत त्यांनी जसा वेगळा ठसा निर्माण केला होता, तसाच महाडच्या राजकारणात ही त्यांचा दबदबा होता. महाड नगरपालिकेचे नगरसेवक काळात त्याची कारकीर्द गाजलेली होती. महाडच्या प्रश्नांना राजकीय आणि पत्रकारीतेतुन न्याय देण्याचा त्यांनी तप्रामाणिक प्रयत्न केला. अनेक पत्रकारांना त्यांनी घडविल्याचे पत्रकार सांगत असतात. इंग्रजीचे शिक्षण ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना मिळावे या साठी महाड मधली पहीली इंग्रजी मिडीयम स्कुल त्यांनी सुरू केली. या या शाळेचा नवयुग विद्यापिठ हा वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे महाडच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नूकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.