कारवाई करायची वेळ येऊ देऊ नका रुग्णसेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना शरद पवारांचा इशारा

78

 ✒️शांताराम दुनबळे(नाशिक, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25जुलै):-नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने डॉक्टर्सची कमतरता भासणार नाही, मात्र जर डॉक्टर्स टाळाटाळ करत असतील. तर मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देखील पवार यांनी दिला.नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेड उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त टेस्टिंग करणे महत्त्वाचे असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटात पूर्ण काम करत आहेत, असं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, पालकमंत्री ना.छगन भुजबळ,आरोग्य मंत्री राजेश टोपे, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ व कृषिमंत्री दादाजी भुसे,खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सुधीर तांबे, माणिकराव कोकाटे, किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, मालेगावच्या महापौर ताहीरा शेख, माजी आमदार पंकज भुजबळ, जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,तसेच राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे,महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्याधिकारी लीना बनसोड नाशिक परिक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग डोर्जे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.