मालेगांव तालुक्यातील तळवाडे येथील सिडिकेट बँक स्टाफ यांची गैरवर्तवणूक

10

🔺 ग्रामस्थ झाले संतप्त

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25जुलै):- मालेगाव तालुक्यातील तळवाङे येथील सिडिकेट बँकेतील स्टाफ यांचा बँकेतील खातेधारकांशी बोलण्याची व समजून सांगण्याची वागणूक चांगल्या पद्धतीची नसल्याने ,येथील गावातील सर्व सामान्य अशिक्षित वर्गातील गोर गरीब वयोवृद्ध व्यक्तीशी कस बोलावं व कशा पद्धतीने समजून सांगावं हे भान न ठेवता येथील कर्मचारी वर्ग आज नाही उद्या या,उद्या नाही पर्वा या अशा स्वरूपाचे उत्तर देऊन व्यक्तींचा वेळ घालवता,खात्या वरती पैसे शिल्लक असून गावाबाहेरील व गावातील श्रीमंत वर्गातील व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात मागितली तेव्हढी रक्कम भेटत आहे ,पण सर्वसामान्य् व्यक्तींना मात्र दोन हजार तीन हजाराच्या वर पैसे भेटत नसल्याची तक्रार आज गावातील मंडळींनी ग्रामपंचायत कार्यालय तळवाडे येथील सरपंच व सदस्य यांच्या निरदर्शनात आणून दिली.व बँकेला कुलूप लावून शाखा प्रबंधक यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेचण्यात आले,तेव्हा गरीब व कर्ज मिळत नसलेल्या व खात्यात पैसे असून पैसे उपलब्ध करून देणे ह्या सर्व गोष्टी शाखा प्रबंधकांच्या पुढे मांडण्यात आल्या.

        पीक कर्ज मिळत नसल्याने गरीब व्यक्ती दहा ते पधंरा दिवस बँकेत फिरून ही त्यांना मिळत नाही,पण गावातील व गावाबाहेरील श्रीमंत व्यक्तींनी सांगताच दोन ते तीन दिवसात पिक कर्ज रक्कम मिळत असल्याची अशी तक्रार गावातील असंख्य व्यक्तींनी सरपंचांसमोर व गावातील आज जमलेल्या सर्व व्यक्तींसमोर मांडण्यात आली व बँकेतील कर्मचारी वर्ग यांना विनंती करण्यात आली.व येथून पुढे सर्वांसाठी समान कारभार करण्याता यावा,व्यक्ती श्रीमंत व पुढारी किंवा गरीब असो सर्वांना संविधानात समान कायदा आहे,ही बाब बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निदर्शनात आणून देण्यात आली आहे.