अमोल भालेराव यांची महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड

27

✒️पुसद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुसद(25जुलै):-पुसद शहराचे भूमिपुत्र अमोल पंचफुला निवृत्ती भालेराव यांना जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्थेने नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर केला आहे.पुसद तालुक्यातील कोरोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडॉन च्या काळात अनेक समाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली.

आहे.स्वखर्चाने असो अथवा दुसऱ्याचा मदतीने गरीब कुंटुबाची त्यांनी मदत केली आहे.अश्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने गौरवन्यात आले आहे.अमोल भालेराव यांना राजस्थान राज्याचा प्रातिष्ठेचा नारायण सामाजिक पुरस्कार,कर्णधार अवार्ड,राष्ट्रव्यापी अभियान कडून वर्ल्ड सोशल आयकॉन अवार्ड,पंचवटी ब.सेवाभावी संस्थे कडून आदर्श भारत पुरस्कार,ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड कडून ओएमजी इनस्पिरियशन इंडियन सन्मान,बाल युवा नारी मंच कडून प्रतिभा सन्मान,कॉसमॉस वर्ल्ड रिकॉर्ड कडून सन्मानपत्र,शील्ड शेकुर सर्विस कडून विशिष्ट सेवा सन्मान,श्रीराम सोसायटी कडून कोरोना फाइटर आयकॉन अवार्ड, डायनामिक वर्ल्ड नेपाळ कडून सन्मानपत्र, शक्ति फ़िल्म प्रॉडक्शन कडून शक्ति योद्धा सन्मान,नारी फांउडेशन कडून विभा मुनि योगारत्न अवार्ड,एत्यादि पुरस्कार देऊन त्यांना गौरववण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी नुकतीच त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराची घोषणा केली.अमोल भालेराव हे वयाच्या पंधराव्या वर्षापासून समाजिक चळवळीमध्ये काम करत आहेत.त्यांनी अनेक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद भूषवले आहे.आपण पदाला योग्य न्याय नाही देऊ शकत म्हणून त्यांनी प्रेमाने काही पद नाकारले सुद्धा आहे.

समाजावारिल अन्याय आत्याच्यारा विरुद्ध,विद्यार्थ्याचे प्रश्न,युवा बेरोजगार यांच्या समस्या,आत्महत्याग्रस्त शेतकरी,बालमजुरी,समाजाच्या समस्या,पर्यावरण अश्या अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो.या पुरस्कार निवडीबद्दल कुंटुब,मित्रपरिवार,सहकारी,समाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,प्रशासकीय सेवक इत्यादिनी त्यांच्यावर अभिनदंनाचा वर्षाव केला आहे.

त्यांच्याशी संपर्क साधला बहुजनवादी महापुरुषाचा आदर्श समोर ठेऊन त्यांनी आपण समाजाचे काही देन लागत असल्यामुळे आणि ते आपले कर्तव्यच असल्याचे यापुढे सुद्धा प्रामाणीक हेतुने समाजसेवा करीत राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा यांचे त्यांनी पुरस्कार जाहिर केल्याबद्दल आभार मानले.