केंद्रीय पत्रकार संघा तर्फे आर.सी पाटील व डॉ.अमिता गावडे यांचा कोरोना योद्धा सन्मान

    41

    ✒️ आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

    श्रीगोंदा(दि.25जुलै):-जगासह राज्यात covid-19 या महामारी ने थैमान घातले आहे पण अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन विभाग,महसूल प्रशासन विभाग,व वैदयकीय कर्मचारी , डॉक्टर्स , पत्रकार , आपले कुटुंब व आपल्या जीवाची पर्वा न करता जीव व कुटुंब धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहे त
    त्याचे कौतुक करणे थोडेच आहे पण केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून काही प्रमाणात कौतुक केले जात आहे.
    केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे, उपाध्यक्ष सचिन मोरे, मुख्य महासचिव जुनेद शेख, सचिव अमोल रणदिवे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचे तहसिलदार आर .सी. पाटील, व गटविकास अधिकारी डाॅ. अमिता गावडे यांना कोरोणा योध्दा पुरस्कार देण्यात आला.