🔺हभप रमेश महाराज भावले यांचे निधन

 ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25जुलै):-शोकसभा प्रसंगी हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांचे भावना व्यक्त नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक येथून जवळच असलेल्या सातपुर परिसरातील हभप रमेश नामदेव भावले वय ५६ यांच नुकतेच निधन झाले त्याच्या शोकसभा प्रसंगी जाण्याच दुःख न पचणार आहे,कारण अजुन बरच काही करायच होत हे स्वप्न मनात घेऊन त्यांनी आपली ईहलोकाची यात्रा संपवली खरतर त्यांचे जाण्याने भावले परिवाराचा आधारवड व वारकरी भाविकांचा अन्नदाता गेला अशा शब्दांत अ.भा.वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब म.आहेर यांनी आपली हभप रमेश भावले यांचे दुःखद निधनाबद्दल भावना व्यक्त केली. पिंपळगांव बहुला येथील प्रतिष्ठीत शेतकरी व एक निष्ठावंत वारकरी हभप रमेश भावले यांचे नुकतेच अकस्मात आजाराने निधन झाले,यावेळी श्रध्दांजली वाहताना आहेर महाराज बोलत होते. आपल्यातून अचानक जाण मनाला खुप चटका लाऊन गेल,संत चुडामणी श्री.निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा पंढरपूर चे पायी जाणारे वारकरी,पिंपळगांव बहुला हरिनाम सप्ताह संत भोजनाचे अन्नदाते,श्री क्षेत्र त्रंबकेश्वर महावारी पायी दिंडीचे वारकरी अन्नदान,पिंपळगांव गांवातील सामाजिक कोणतही काम असेल त्यात नेहमी सक्रिय असणारे एक समाजमनातील ताईत बनलेले धार्मिक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यान सर्व परिवाराचा आधार,पालनकर्ता, वारकरी भाविकांना आपलासा वाटणारा, आप्तेष्ठांची, परिवाराची काळजी करणारा एक लढवय्या,शरीरयष्ठी मजबुत असणारा दुसर्याला धीर हिंमत देणारा माणुस आज आपल्यात नाही हे मनाला खरच पटत नाही,ज्यांचा चेहरा डोळ्याआड होतच नाही अशी एक सर्वावर प्रेम करणारी आपल म्हणनारी हक्काची व्यक्ती गेल्याच मनस्वी दुःख होतय,असे विभागीय अध्यक्ष हभप सुभाष महाराज जाधव यांनी म्हटले आहे.यावेळी भावले परिवार, श्री.विलास धात्रक,हभपश्री कैलास महाराज घुगे व भावले कुटुंबीय उपस्थित होते.त्यांचे पाठीमागे आई, पत्नी,दोन भाऊ श्री.शरद नामदेव भावले, श्री सुरेश नामदेव भावले, व दोन मुले गोकुळ रमेश भावले,रोशन रमेश भावले तसेच दोन मुली असा मोठा एकत्रीत परिवार आहेत. अखिल भारतीय वारकरी मंडळ व पंचक्रोशीतील सर्व गायक,वादक, किर्तनकार,महिला उपस्थित होते.

Breaking News, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED