उमरखेड शहर कडकडीत बंद !

61

🔹जालना येथील घटनेचा निषेध नोंदवला…

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 4 सप्टेंबर):-जालना जिल्ह्यातील आंतरवली गावात मराठा बांधवांच्या आंदोलनावर अमानुषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्ज घटनेचा निषेध म्हणून आज दि. ४ रोजी मराठा सकल समाजाच्या उमरखेड बंदच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकल मराठा समाजाने काल तहसीलदार यांना आजच्या बंदबाबत निवेदन देवून शहरवासीयांना बंदचे आवाहन केले होते.

या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत स्वंयस्फुर्तीने दुकाने बंद ठेवलीत.तसेच बंदमध्ये शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

आज सकाळपासून मराठा सकल समाज कार्यकर्त्यांनी काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करून शासन व पोलिस प्रशासनाचा विरोधात घोषणा देवून निषेध व्यक्त केला.

यावेळी सकल मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर या बंदला उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी व एमआयएम पक्षाने पाठिंबा दिला होता. यावेळी ठाणेदार शंकरराव पांचाळ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.