बरबडा चे सरपंच बालाजी मदेवाड यांचा सन्मान

21

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.26जुलै):- देशात कोरोना संकट काळात शासन व प्रशासनासोबत विविध स्वयंसेवी संस्था कोरोना युद्धात सहभागी होत आहेत, याच अभियानाचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील सरपंच बालाजी मदेवाड यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात विविध उपक्रम राबविले आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

      बरबडा ता. नायगाव जि. नांदेड येथील बरबडा नगरीचे सरपंच बालाजी मोहनराव मदेवाड यांनी गावातील गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करून दिलासा दिला, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा बरबडा येथे वृक्षारोपना सोबतचगावातील सर्वत्र गल्लीमध्ये नायगाव येथील अग्निशामक दलाची गाडी च्या साह्याने औषधाची फवारणी गावामध्ये केली आहे. त्यामुळे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य,शिक्षक मित्र ग्रामीण कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्याकडून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.