🔹घटस्फोटाचा देण्यात आला आदेश

🔸जर्मनीत असलेल्या पतीचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविला

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.26जुलै):-येथील दिवाणी न्यायालयात व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेऊन घटस्फोटाचा आदेश देण्यातआला आहे.येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. बी. देसाई यांच्या न्यायालयात हिंदू विवाह कायदा कलम 13 ब प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी माहे नोव्हेंबर 2019 मध्ये पती-पत्नीने वैवाहिक खटला दाखल केला होता. सहसंमतीच्या घटस्फोटासंबंधीच्या खटल्यामध्ये खटला दाखल केल्यानंतर सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी असतो. तो प्रतीक्षा संपल्यानंतर शपथेवर जबाब घेऊन ते घटस्फोटाच्या निर्णयास ठाम असल्यास नंतर न्यायालयाच्या आदेशाने घटस्फोट दिला जातो.वरील प्रकरणात घटस्फोटासंबंधीचा वैवाहिक खटला दाखल केल्यानंतर सदर खटल्यातील पतीस नोकरीनिमित्त जर्मनीस जावे लागले. वरील खटल्याचा प्रतीक्षा कालाधवी माहे मे 2020 मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर उभयंतांनी न्यायालयापुढे समक्ष हजर राहून शपथेवर जबाब देणे आवश्यक होते. मात्र,दरम्यान माहे मार्च 2020 पासून जगभर टाळेबंदी लागू झाल्यामुळे या प्रकरणातील पतीस जर्मनीहून सातारा येथे येणे शक्य नव्हते. त्यासाठी अर्जदारांच्या वतीने एंड. गिरीश कुलकर्णी यांनी न्यायालयास अर्ज करून जर्मनी येथे असलेल्या पतीचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगठ्वारे नोंदविण्याची विनंती केली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील अमरदीप सिंग विरुद्ध हरविन कौर या न्यायनिवाड्याचा आधार घेण्यातआला.अर्जदारांची विनंती न्यायालयाने मान्य करून सदर पतीचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगठ्ठारे नोंदवला, तसेच पत्नीचा जबाब समक्ष नोंदवला. त्यानंतर दोघांची मागणी व जबाब विचारात घेऊन न्यायालयाने गुरुवारी (ता. 23) घटस्फोट मंजूर केला. या प्रकरणी अर्जदार पती- पत्नीतर्फे एंड. गिरीश कुलकर्णी व एंड. अक्षता गुजर यांनी काम पाहिले. परदेशात असलेल्या पक्षकाराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगह्ठारे सुनावणी घेऊन निकाल देण्याचा साताऱ्यातील हे पहिलेच प्रकरण असावे, असे बोलले जात आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED