कुस्ती-मल्लविद्या श्रीगोंदा तालुका तांत्रिक प्रमुखपदी पै प्र प्राध्यापक किरण बंड यांची निवड

  42

  ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

  श्रीगोंदा(दि.26जुलै):-कुस्ती-मल्लविद्या महासंघ श्रीगोंदा तालुका तांत्रिक समिती प्रमुख पदी आढळगाव जय बजरंग तालमीचे मल्ल प्रा किरण बंड सर यांची कुस्ती-मल्लविद्या महासंघ संस्थापक पै गणेश बानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुका कार्यकारणी मध्ये तालुका समिती प्रमुख पदी सर्वानुमते आज निवड करण्यात आली या निवडीचे पत्र अहमदनगर जिल्हा कुस्तीमध्ये विद्या महासंघाचे अध्यक्ष मिलिंद जपे तालुकाध्यक्ष शिवराय केसरी पहिलवान प्राध्यापक पै प्रा रोहन बंटी रंधवे सर यांच्या हस्ते देण्यात आले.
  किरण बंड यांच्या कुस्ती जिदो या शालेय क्रीडा प्रकार मध्ये राज्यपातळीवर नावलौकिक आहे त्याच प्रमाणे त्यांनी राज्या मध्ये नाहीतर राज्याबाहेर पण आणि कुस्तीची मैदाने गाजवली आहेत सध्या ते पुणे मध्ये कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत आहे तसेच त्यांची कुस्ती क्षेत्रांमधील कार्य आणि त्यामधील अनुभवाची दखल घेऊन त्यांची श्रीगोंदा तालुका तांत्रिक प्रमुख पदी नियुक्त करण्यात आली पैलवान किरण बंड ला जय बजरंग तालमीचे वस्ताद दीपक नाना भालेराव पैलवान श्रीकांत भोस यांचे मार्गदर्शन लाभले आहे या निवडीमुळे मला माझे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे त्यांचे मी सोने करेल व श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा चमकेल त्यांच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत राहील
  तसेच श्रीगोंदा तालुक्यात मध्ये राष्ट्रीय पातळीवर कुस्ती प्रशिक्षण केंद्र कसे उभा राहील त्यासाठी प्रयत्न करत राहील असे त्यावेळी ते बोलत होते.
  त्यांच्या या निवडीबद्दल निमित्त निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष पै सुभान तांबोळी, पै माऊली उबाळे , पै अमोल डाळिंबे, पै अकबर तांबोळी, पै प्रमोद ठवाळ पै नितीन सोनवणे , पै नितीन गायकवाड व जय बजरंग तालमीचे सर्व सदस्य तर्फे नियुक्तीबद्दल सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.