चिमुर शहरात तीन कोरोना बाधित – वडाळा (पैकू) येथील दोन तर इंदिरा नगर मध्ये एक

17

🔺काल (दि.26जुलै) रात्री उशिरा प्राप्त झाला अहवाल

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.27जुलै):-नगर परिषद चिमुर चे कार्यक्षेत्रात काल (दि.26जुलै) रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार तीन कोरोना बाधितांची भर पडली. यात वडाळा पैकू येथील दोन तर इंदिरा नगर येथील एकाचा समावेश आहे.

      तीनही रुग्ण बाहेर जिल्ह्यातुन प्रवास करून आले होते, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व यवतमाळ येथून प्रवास करून आलेल्यापैकी दोन वैक्ती संस्थात्मक विलगी करणात होते.अशी माहिती चिमुर उपजिल्हा रुग्णल्याचे अधिक्षक डॉ.गो.वा. भगत यांनी दिली.