पब्जी खेळताना ‘हार्ट अटॅक’, १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    39

    ✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नांदेड(दि.27जुलै):-मोबाईलवर पब्जी गेम खेळत अस२२तानाच हार्ट अटॅक आल्याने तरुणाचा दुदैर्वी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नांदेडमधील १८ वर्षीय युवकाने उपचारापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.

    नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी गावातील ही घटना आहे. राजेश नंदू राठोड हा तरुण आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. गेम सुरु असतानाच राजेशला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. राजेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जोरदार हार्ट अटॅक आल्याने त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.
    राजेशच्या अकस्मात मृत्यूने राठोड कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. तरुण मुलाच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेने माहूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पब्जी खेळाच्या नादात मानसिक संतुलन हरवल्याच्या काही घटना याआधीही देशाच्या कानाकोप-यातून ऐकायला मिळाल्या आहेत. पब्जीच्या नादात अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आल्याने पालकवर्गाकडून या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.