सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरतीचा परिपत्रक काढला तो रद्द करण्यात यावा यासाठी अन्यथा आमरण उपोषण करणार-ॲड. अनुप आगाशे

261

✒️बळवंत मनवर(विशेष प्रतिनिधी)

पुसद(दि.26सप्टेंबर):-आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ली आ. नांदेडचे ॲड. अनुप आगाशे यांनी मा. राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य, मा. अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र, मा.एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

आणि राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरती प्रक्रिया साठी जो जीआर काडला आहे तो रद्द करण्यात यावा तसेच ज्या या कंपन्यांना मिळाला भरतीचा ठेका रद्द करण्यात यावा अॅक्सेंट टेक, सी.एम.एस.आयटी, सी.एस.सी.ई गव्हर्नन्स, इनोवेव आयटी, कारिस्टल इंडग्रेटेड , एस-2 इन्फोटेक, सैनिक इंटेलिजन्स
सिंग इंटलिजन्स, उर्मिला इंटरनॅशनल, अन्यथा मुंबई येथे मंत्रालय आझाद मैदानावर दिनांक १६/१०/२३ रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा ईशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने जो परित केला आहे तो महाराष्ट्र युवक व युवती यांच्या भविषवाची विरोध असून महाराष्ट्र राज्य शासन खेळ करीत आहे.

अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर २०२३ रोजी नऊ कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. यातील काही कंपन्या राज्याबाहेरील आहेत. राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरत असताना थेट आरक्षणाला कात्री लावण्यात आली आहे.

सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी आत्तापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते. दोन कंपन्याना हे काम देण्यात आले होते. शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता. आता मात्र याची व्यापकता वाढवली आहे. यामध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आला आहे. यासाठी नऊ कंपन्यांना अधिकार देण्यात आले आहेत.

सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी आत्तापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते. दोन कंपन्याना हे काम देण्यात आले होते. शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता. आता मात्र याची व्यापकता वाढवली आहे. यामध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आला आहे. यासाठी नऊ कंपन्यांना अधिकार देण्यात आले आहेत.

या कंपन्यांना मिळाला भरतीचा ठेका रद्द करण्यात यावा अॅक्सेंट टेक, सी.एम.एस.आयटी, सी.एस.सी.ई गव्हर्नन्स, इनोवेव आयटी, कारिस्टल इंडग्रेटेड , एस-2 इन्फोटेक, सैनिक इंटेलिजन्स
सिंग इंटलिजन्स, उर्मिला इंटरनॅशनल

राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरती प्रक्रिया साठी जो जीआर काडला आहे त्या जीआर चा जाहीर निषेध करून राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरती प्रक्रिया साठी जो जीआर काडला आहे तो रद्द करण्यात यावा तसेच ज्या या कंपन्यांना मिळाला भरतीचा ठेका रद्द करण्यात यावा अॅक्सेंट टेक, सी.एम.एस.आयटी, सी.एस.सी.ई गव्हर्नन्स, इनोवेव आयटी, कारिस्टल इंडग्रेटेड , एस-2 इन्फोटेक, सैनिक इंटेलिजन्स सिंग इंटलिजन्स, उर्मिला इंटरनॅशनल अन्यथा मुंबई येथे मंत्रालय आझाद मैदानावर दिनांक १६/१०/२३ रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनुप आगाशे असे निवेदनात म्हटले आहे. मुंबई आझाद मैदानाव दिनांक १६/१०/२३ रोजी ॲड. अनुप आगाशे जिल्हाध्यक्ष ली आघाडी, अमर वाघमारे जिल्हाध्यक्ष मीडिया आघाडी नांदेड, बालाजी नागेश्वर जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी नांदेड आमरण उपोषण करणार आहेत अशी माहिती दिली आहे.