✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगणघाट(दि.27जुलै)राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा च्या माध्यमातून डॉ कफिल खान यांच्या सुटकेसाठी दिनांक 27-07-2020 सोमवार रोजी राष्ट्रपतीला हिंगणघाट तहसीलदार द्वारा निवेदन देण्यात आले.
लोकशाही मध्ये सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात आंदोलन करणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकारांतर्गत संविधानिक मार्गाने एनआरसी, सिएए या कायद्या विरोधात देशभर आंदोलन झाले होते, लोकडाऊन च्या काळात केंद्र सरकार द्वारे विशेषतः एनआरसीचा विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्याला व विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
या कायद्याचा विरोध करणारे डॉ कफिल खान वर खोट्या आरोपात कारागृहात टाकण्यात आले, या अगोदर गोरखपूर अपघात घटनेत डॉ कफिल यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुलांचा जीव वाचविला होता, त्याठिकाणी उत्तरप्रदेश सरकारच्या हलगर्जीपणामुळे ७० मुलांचे जीव गेले, त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप लावून कारागृहात टाकल्या गेले होते त्यानंतर डॉ कफिल खानची सुटका झाली.
आताही डॉ कफिल खानला नाहक त्रास देऊन कारागृहात टाकण्यात आले आहे जिथे डॉ कफिलच्या जीवाला धोका आहे.
त्याचप्रमाणे एनआरसी,सिएए चा विरोध करणारे जेएनयु, जामिया इस्लामीया आणि अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालय च्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेले आहे, नुकत्याच झालेल्या दिल्लीतील दंग्यांमध्ये पोलीसद्वारा हाच मार्ग आजमावल्या जात आहे, याविरोधात संपूर्ण भारतात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ३५राज्य,५००जिल्हे आणि ४००० तहसील मध्ये मा.राष्ट्रपती ला मा.तहसीलदार द्वारे निवेदन देण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांवरच्या खोट्या केसेस तात्काळ मागे घेऊन डॉ कफिल खान यांची सुटका करावी असे निवेदन देत राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष हाजी मिर्जा परवेज बेग, तालुका अध्यक्ष तालिब शेख, शहर अध्यक्ष महम्मद शाकिर, बहुजन क्रांती मोर्चा संयोजक इंजि.निखिल कांबळे, मयूर पाटील, गेमदेव म्हस्के, नम्रता नरांजे बिविसीपी, गजानन माऊसकर, लक्ष्मीकांत जवादे, चंद्रहास कांबळे,गजानन वऱ्हाडे, संजय डोंगरे इत्यादी सहयोगी संघटन उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी

©️ALL RIGHT RESERVED