नायगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र दुकानदाराकडून युरिया खते देण्यास टाळाटाळ

    50

    ?तहसीलदारांना निवेदन सादर

    ✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.27जुलै):- अंतरगावातील व नायगाव तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी युरिया खताची अत्यंत आवश्‍यकता असून. नायगाव तालुक्यातील सर्व दुकानदारांनी जाणीव पूर्वक. युरिया खताचा स्टॉक करून. एका पोत्याची किंमत 350 ते 400 रुपये करून शेतकर्‍यांची जाणीवपूर्वक लूट करत आहेत. व सरकारच्या माध्यमातून काही दिवसापूर्वीच युरिया खताचा भरपूर असा उत्पादन साठा आहे. असे सांगण्यात आले होते. तरी सर्व दुकानदारांनी खते देत नसून. योग्य त्या भावा मध्ये सर्व शेतकऱ्यांना खते द्यावी. असे आदेश असून देखील दुकानदाराने जाणीवपूर्वक खत संपले असे दाखवत आहेत. तरी मा. तहसीलदार साहेबांना नायगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खते खुले करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा. अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. 

    निवेदन सादर करताना माजी उपसरपंच संभाजी शिंदे, प्रभाकर शिंदे, शामराव तोडे, सतीश शिंदे ,ज्ञानेश्वर तोडे आदी उपस्थित होते.