जिल्हयात बाल संगोपन योजनेवर जनजागृती-मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस आता अनाथ बालकांसाठी मैदानात!

108

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 30 सप्टेंबर):-मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस अँड वेलफेअर ही संघटना सामाजिक कार्यात आपले मोठे योगदान देत आहे.

रेशन योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक मुला-मुलींच्या वसतिगृह आदींबाबत आंदोलन करून शासन दरबारी पाठपुरावा करते, वेळप्रसंगी न्यायालयीन लढा लढून न्याय देण्याचा संघटनेने प्रयत्न केला आहे. त्यात संघटनेला पूर्णपणे यशही मिळाले आहे. संघटनेने आता अनाथांच्या हक्कासाठी पुढाकार घेतला आहे.

निराधारांना आधार बना अभियान अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्ते जोमाने काम करत आहे.

त्यात उमरखेड तालुक्यात मरसुळ, बेलखेड, पळसी, कुपटी, मुळावा, ब्राह्मणगाव, चातारी, मेट,ढाणकी , बिटरगाव, निंगनुर, फुल सावंगी, गोड वडसा, उमरखेड आदी गावा गावात जावून परिश्रम घेवून कॉर्नर सभा, मिटींगा, गृह भेटी द्वारे जन जागृती करत आहे .

यासाठी एमपीजेने सर्व्हेक्षण करून बालकांना मोफत अर्ज भरून देऊन त्यांना मार्गदर्शन करत आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत एका मुलाला 2250 रूपये महिन्याला मिळतात. ही रक्कम त्यांच्यासाठी फार मोठी आहे.

महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांना प्रति बालक दरमहा रू.2250/- परिपोषण अनुदानाची तरतुद आहे.

शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जातात मात्र गरजवंतांना त्यांची माहिती भेटून सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणून एमपीजे चे कार्यकर्ते गावो गावी जावून जन जागृती करत आहेत.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी यांनी एमपीजेद्वारे मानवकल्याणाच्या हितार्थ जे कार्य सुरू आहे त्यात आपणही सहभाग नोंदवून बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र असणार्‍या बालकांना लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण प्रयत्न करावा व पुण्याईच्या या सत्कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.

एमपीजेचे तालुकाध्यक्ष अन्सार हुसैनी, शहराध्यक्ष मोहसीन राज, मुजाहीद खान, रफीका ताई पठाण, अब्दुल जहीर, डॉ. फारुक अबरार आदी कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत .शासन योजना आखत असते मात्र त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्तांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याने त्यांना पुढाकार घेण्याचे आवाहान तालुका अध्यक्ष अन्सार हुसैनी यांनी केले आहे.

अधिक माहीती साठी मोहसीन राज 9890816836, रफीका ताई पठाण 93711 78965 , हाफीज अन्सार 942-256-3925 यांच्याशी संपर्क कर त्याचे आवाहन करण्यात आले.