

(सेवानिवृत्तीनिमित्त अभंग)
सेवानिवृत्तीचा । उगवला दिन ।
निरोपाचा क्षण । आज आला ॥ १ ॥
डॉक्टर गुल्हाने । एक महामेरू ।
शैक्षणिक गुरु । गजानन ॥ २ ॥
विद्यापीठांमध्ये । सेवा कार्य केले ॥
विद्यार्थी घडले । जीवनात ॥ ३ ॥
विभाग प्रमुख । शिक्षण शास्त्राचे ।
सर्व विद्यार्थ्यांचे । गुरुवर्य ॥ ४ ॥
जिवंत प्रक्रिया । वर्ग अध्यापन ।
शिक्षकांना जाण । गजानन ॥ ५ ॥
नवीन नवीन । शिक्षण प्रवाह ।
संशोधन चाह । सर्वोत्तम ॥ ६ ॥
अध्यापन कार्य । पस्तीस वर्षाचे ।
हित विद्यार्थ्यांचे । साधियले ॥ ७ ॥
सेवेचा गौरव । प्राप्त पुरस्कार ।
कार्याची ती धार । तेजस्वीच ॥ ८ ॥
अध्यापन ग्रंथ । करुनी लेखन ।
वर्ग अध्यापन । आदर्शच ॥ ९ ॥
सेवानिवृत्तीच्या । हार्दिक शुभेच्छा ।
मनस्वी सदिच्छा । गजानना ॥१० ॥
संत कबीर कविराज
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
अभंगकार
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती. भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९