मांगली येथे गणेशोत्सवानिमित्त “मी लखलखती चांदणी” कार्यक्रमाचे आयोजन

54

🔸माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1ऑक्टोबर):-खास गणेशोत्सवानिमित्ताने तालुक्यातील मांगली येथे युवा गणेश मंडळ मांगलीच्या वतीने डान्स हंगामा झाडीपट्टी वडसा यांच्या “मी लखलखती चांदणी” या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक _*कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मांगलीचे माजी उपसरपंच गोकुळदासजी कार तर उपाध्यक्ष म्हणून मांगलीचे सरपंच उषाताई बनकर, राजुभाऊ दोनाडकर उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भावेश दोनाडकर उपसरपंच मांगली, अतुल सोंडवले ग्रा. पं. सदस्य, दिनेश कामडी ग्रा. पं. सदस्य, सुवर्णाताई मेश्राम ग्रा. पं. सदस्या, रेखाताई कामडी ग्रा. पं. सदस्य, सुप्रिया फुलझेले ग्रा. पं. सदस्य, ठाकरे बाबुसाहेब मांगली, खुशाल दोनाडकर अध्यक्ष तं. मु. स., दुर्गेश कार रोजगार सेवक मांगली, आशिष प्रधान ऑपरेटर, नानाजी मानमुंडरे माजी सरपंच, रीताताई कार अंगणवाडी सेविका मांगली आदी मान्यवर उपस्थित होते.

“मी लखलखती चांदणी” या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले कि, गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात सर्वात आधी लोकमान्य टिळक यांनी केली होती. समाजातील भेदाभेद नष्ट होवून त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. हा त्या मागील त्यांचा उद्देश होता. गणपती उत्सव मोठ्या भक्तिभावाने आपण साजरा करीत असतो. विघ्नहर्ता गणराया आपल्या जीवनातील दुःख नष्ट करून आपल्या जीवनात सुख, शांती आणि आनंद देवो हीच गणरायाला साकडे घालतो. असे त्यांनी सांगितले.

युवा गणेश मंडळ मांगलीच्या वतीने डान्स हंगामा झाडीपट्टी वडसा यांच्या “मी लखलखती चांदणी” या सांस्कृतीक कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा गणेश मंडळ, मांगलीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.