
🔹मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर
✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.२७जुलै) :- महात्मा जोतिबा फुले मार्केट ब्रम्हपुरी यांच्या वतीने ब्रम्हपुरीतील नगरपरिषदचे(मुख्याधिकारी नगरपरिषद) मंगेश वसेकर यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नगरपरिषद ने कोरोनाच्या महामारिमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा सर्व व्याप्याराना तसेच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली.आणि जुनी गुजरी उठविलेली आहे तरी सुध्दा काही व्यापारी लोक कृषी उत्पन्न बाजार समिती च्या जागेवर न बसता जुन्या गुजरिकडे किंवा रस्त्या च्या कडेने बसत असतात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर बसणाऱ्या व्यापाऱ्यांचा गिऱ्हाईक न आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी अतिक्रमण करून बसलेल्या व्यापाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना कृषी बाजार समितीच्या जागेवर बसण्यास सक्तीचे करावे असे महात्मा ज्योतिबा फुले सबजी मार्केट ब्रम्हपूरी यांच्या वतीने करण्यात आली तसेच ह्या जागेवर बल्ब ची सुविधा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असे सांगण्यात आली तसेच पाऊसाळा लक्षात घेता ज्या ठिकाणी पाणी साचतो तिथे मुरूम टाकावे असे सांगण्यात आले. हे निवेदन बघता ब्रम्हपुरी चे सी. ओ. श्री. मंगेश वासेकर साहेब यानी सर्वाना विश्वासात घेऊन सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावू असे म्हटले आहे. यावेळी शाखीर शेख, आबिद शय्यद , जगदिश रामटेके, सुमनबाई आंबेकर , सुनील गुरणुले, अजय आंबेकर , शरीफ शेख (बाजार ठेकेदार ब्रम्हपुरी), उज्ज्वला सोनडवले, छाया चिंचेकर, छाया पंडे हे सर्व उपस्थित होते.