राजुरा तालुक्यातील चर्चित आदिवासी वसतिगृह अत्याचार प्रकरणाला घेतले वेगळे वळण

17

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27जुलै):-आमदार धोटे यांचा पत्रकार परिषदेतील आदिवासी समाज हा पैश्यासाठी अत्याचार प्रकरण समोर आणतो या वाक्यावर आदिवासी समाजातील बिरसा क्रांती दल चे कमलेश आत्राम यांनी आमदार धोटे यांच्या वक्तव्यावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

इन्फन्ट जीसस कॉन्व्हेंट मधील वर्षी तब्बल 18 ते 20 मुलींवर अत्याचार प्रकरण घडले असताना, निवडणुकी कालावधीत ते प्रकरण संस्थापक अध्यक्ष धोटे यांनी दाबून ठेवले, परंतु त्या पीडित मुलींची प्रकृती खालावल्याने हे प्रकरण उघडकीस आले होते.

परंतु या तक्रारींवर फिर्यादीने आरोपिसोबत तडजोड केली व त्यांना उच्च न्यायालयाचा दणका मिळाला अश्या मथळ्याखाली दैनिक वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करून समाज माध्यमावर व्हायरल केली, त्या बातमीने फिर्यादी कमलेश आत्राम यांची बदनामी केली व समाजात त्यांचे खच्चीकरण झाले या कारणाने आत्राम यांनी दैनिक वृत्तपत्राच्या संपादकावर व आरोपी आमदार धोटे यांचे अब्रू नुकसानीचा दावा ठोकून यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बिरसा क्रांती दलाचे नागपूर विभाग प्रमुख डॉ. पंकज कुलसंगे, जिल्हाध्यक्ष कमलेश आत्राम व जिल्हा महासचिव जितेश कुलमेथे यांची उपस्थिती होती.