मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस चिमुरात रक्तदानाने साजरा

15

🔹भारतीय विद्यार्थी सेनेचे आयोजन

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.27जुलै):-शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना प्रनित भारतीय विद्यार्थी सेना चिमुर च्या वतीने रक्तदान करुण साजरा करण्यात आला,भारतीय विद्यार्थी सेना शाखा चिमुर च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवहानाला प्रतिसाद देत चिमुर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित रक्तदान शिबिरत 21 रक्तदात्यनि रक्तदान केले, भारतीय विद्यार्थी सेनाचे उपजिल्हा प्रमुख श्रीहरी उर्फ बालू सातपुते युवा सेना तालुका प्रमुख आशीष बगुलकर यानी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या रक्तदान शिबिरात शिवसेना जिल्हा प्रमुख नितिन मत्ते, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते हे प्रामुख्याने उपस्तित होते, याप्रसंगी माजी उपजिल्हा प्रमुख अनिल डगवार, धर्मसिंग वर्मा, माझी तालुका प्रमुख भाऊराव थोंबरे, माजी उपतालुकाप्रमुख रमेश भिलकर, विनायक मुंगले, सुधीर नन्नावरे, बंडू पारखी, किशोर उकुंड, विट्ठल पोइनकर यशवंत मोहिंकर, केवलसिंग जूनी, सुधाकर निवटे, प्रफुल कमाने, कवडू खेड़कर, सुरेश गजभे, पिंटू शेट्टे, व इतर शिवसैनिक उपस्तित होते.