वनमंत्र्याच्या जिल्ह्यात होत आहे बूरूड कारागिरांवर अन्याय, निकृष्ट दर्जाचा बांबू पुरवठा करून तोंडाला पुसली जात आहे पाने-संतोष पटकोटवार

63

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16ऑक्टोबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील, कोरपना, कोठारी, तोहोगाव, गडचांदूर, बोर्डा, वायगाव इत्यादी ठीकाणी बूरूड कामगार अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत, हिरव्या बांबू पासून कलाकुसरीच्या व विविध प्रकारच्या वस्तू तयार करून विक्री करुन उदरनिर्वाह करण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याने, त्यांना बूरडी कामा करीता दररोज हिरव्या बांबूची गरज भासत असते, बूरूड कारागिरांना ऊतम रीतीने जीवन जगता यावे यासाठी शासनाकडून कार्ड धारकांना सवलती दरात वार्षिक एक हजार पाचशे नग हीरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय आहे.

परंतु गेल्या काही वर्षांपासून वनविभाकडून कायदयाचे योग्य रितीने अमलबजावणी होत नसल्याने अल्प प्रमाणात निकृष्ट दर्जाचा बांबू पुरवठा केल्या जात असल्याने बूरूड कामगारांत कमालीची निराशा पसरली आहे,बलारपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा, सूधिरभाऊ मुनगंटीवार हे दोनदा वनमंत्री झाले व पालकमंत्री सूधा झाले, चंद्रपूर जिल्ह्याला वनमंत्री पद मिळाल्याने बूरूड कामगारांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले, परंतु तो आनंद काही काळच टिकला, मा, सुधीर भाऊ म्हणाले होते””अछे दिन आयेंगे”‘ महणुन बूरूड कारागिरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.

सुधीर भाऊ मुळे बुरुड कारागिरांना “चांगले दिवस”” येतील असे वाटत होते मात्र वारंवार निकृष्ट दर्जाच्या बांबू पुरवठयामुळे फार “”वाईट दिवसा””ला सामोरे जावे लागत आहे ,बूरूड कारागिरा़ना ऊतम प्रतीचा बांबू पुरवठा करावा अशी मागणी वनविभागाला वारंवार करण्यात येते मात्र या आठ नऊ वर्षांच्या कालावधी मध्ये एकदाही ऊतम प्रतीचा बांबू बूरूड कारागिरांना पुरवठा झालेला नाही, किवा कोणत्याही प्रकारचे शासकीय लाभ बुरुड कामगारांच्या पदरी पडले नाही, या ऊलट वनविगाच्या जाचक अटीमुळे बांबु व्यवसाईकांना वनविगाकडुन कायदयाचा धाक दाखवून ठिकठिकाणी गुन्हेगारा प्रमाणे वागणूक दिली जात असून दंड वसूल केलया जात असल्याने बूरूड कारागिरा़च्या प्रगतीमधये बाधा निर्माण होत आहे व उपासमारीची वेळ येणयाची दाट शकयता वर्तवली जात आहे.

वनविभागाने बूरूड कारागिरांना निकृष्ट दर्जाचे बांबू पुरवठा करुन बूरूड कारागिरांची दिशाभूल करू नये व शासन निर्णयाची योग्य रितीने अमलबजावणी करावी व वेळोवेळी ऊतम प्रतीचा बांबु पूरवठा करुन बूरूड कारागिरा़ना सहकार्य करावे अशी मागणी बूरूड समाजाने केली तसेच पाच ते सहा वेळा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदार महणून निवडून आलेले नामदार सूधिरभाऊ मूनगंटीवार हे दोनदा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिलहयाचे पालकमंत्री पद भूषविले परंतु याचा एकाही बुरुड कारागिराला कोणत्याही प्रकारचा आर्थिक किवा शासकीय लाभ मिळाला नाही असा आरोप चंद्रपूर जिला बूरूड समाजाचे संघटन सचिव तथा शेतकरी संघटनेचे सरचिटनिस संतोष पटकोटवार यांनी केला