दि-29 जुलै ला दहावीचा निकाल लागणार

    42

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी):-7757073260

    नांदेड(दि28जुलै):-दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे दहावीच्या निकालांना उशीर झाला आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.