पत्रकार संदीप कसालकर यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव

17

✒️ आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.28जुलै):-जगासह देशात कोविड-19 या महामारी थैमान घातले आहे अशा परिस्थितीत महसूल प्रशासन विभाग, पोलीस प्रशासन विभाग, वैद्यकीय कर्मचारी तील डॉक्टर्स ,नर्स त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांच्या सहाय्याने नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती पोचून आपले कर्तव्य बजावत असणारे पत्रकार यांची कौतुक करणे थोडेच आहे पण याचे भान राखत पोलीस साठी राष्ट्रीय स्तरावर असणारी संघटना “पोलीस की आवाज ” या संघटनेचे संस्थापक – पाल पंधारी , राष्ट्रीय अध्यक्ष – गगन सर , राष्ट्रीय उपाध्यक्ष- महेंद्र तिवारी यांच्यावतीने केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इंडिया 24 तास चे मुख्य संपादक माननीय श्री पत्रकार संदीप कसालकर सर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

केंद्रीय पत्रकार संघाच्या सर्व सदस्य , पदाधिकारी सर्वांच्या वतीने कौतुक व अभिनंदन होत आहे