केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने रांजणगाव पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

    70

    ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

    ✒️श्रीगोंदा(दि.28जुलै):-जगासह देशात कोविड-19 या महामारी थैमान घातले आहे अशा परिस्थितीत महसूल प्रशासन विभाग, आशा वर्कर, वैद्यकीय कर्मचारी तील डॉक्टर्स ,नर्स पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून कुटुंब आणि जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे याचेच भान ठेवत केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप कसालकर यांच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या समती नुसार केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रफुल कदम व महिला पोलीस निरीक्षक भाग्यश्री कुटे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुतार यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.