
🔸मातंग एकता आंदोलन संघटनेचे आमदार कैलास गोरंटयाल यांना निवेदन
जालना(पुरोगामी संदेश नेटवर्क)
जालना(दि.29जुुलैै):-जगविख्यात साहित्यिक डॉ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रधानमंत्री नरेद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शिफारस पत्र देण्याची मागणी केली आहे.
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी घुले उपाध्यक्ष शंकर शिरगुळे तालुकाध्यक्ष केशव पांजगे यांनी जालना येथे आमदार कैलास गोरटयाल यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली व मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने भारतरत्न पुरस्कार प्राप्त साठी शिफारस पत्र देण्याची मागणी केली असता आमदार कैलास गोरंटयाल यांनी तत्काळ मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र मेल करून डॉ अण्णाभाऊ साठे भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली.