शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गोपाळ मंत्री

160

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):/ शहरातील सरस्वती विद्यालयातील शिक्षक गोपाळ मंत्री यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिनांक 7 नोव्हेंबर रोजी परभणी येथील सुमनताई गव्हाणे विद्यालयात झालेल्या जिल्हा बैठकीत देण्यात आले.

तसेच याप्रसंगी गंगाखेड तालुका अध्यक्ष म्हणून प्रा.विजय बेरळीकर तर कार्यवाह सुरेश लव्हाळे तर पालम तालुका अध्यक्ष पदी संजय बेद्रे यांची सुद्धा यावेळी निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी लातूर येथील राज्य कार्यालयीन मंत्री मधुकरराव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष उत्तम केंद्रे, कार्यवाहक सुभाष भारती, महानगराध्यक्ष डॉ. अनिल मैड यांची प्रमुख उपस्थिती होती.