दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग मित्र अॅप मध्ये दिव्यांग नोंदणी करावी- समीर पटेल

36

🔸दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हातील  दिव्यांगाणी 31 जुलै पर्यंत रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.29जुलै):-नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगासाठी विशेष दिव्यांग मित्र नांदेड अॅपची नव निर्मीती केली आहे.नांदेड जिल्हातील सर्व दिव्यांग व्यक्तीला शासकिय योजनांचा व तसेच दिव्यांग विषयी विविध प्रकारच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक योजना व तसेच दिव्यांग विषयी ईतर योजनेची माहिती व लाभ आणि मदत घरपोच मिळविण्या करीता नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग मित्र अॅप आप आपल्या मोबाईल मध्ये 31 जुलै पर्यंत अॅप डाऊनलोड करुन घ्यावी.दिव्यांग व्यक्तीला भविष्यात घरपोच योजनाचा लाभ घेता येईल.या करीता दिव्यांग मित्र अॅपची निर्मिती केली आहे. या योजनेची अंमलबजावणी संपुर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे. आणि हदगांव तालुक्यातील दिव्यांग मित्र नांदेड अॅपची काटेकोर अंमलबजावणी साठी *हदगांवचे तहसिलदार मा.श्री. जिवराज जी डापकर साहेब व गट विकास अधिकारी तथा दिव्यांग मित्र मा.श्री. केशवजी गड्डापोड साहेब आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी मा.श्री. विजयजी येरावाड यांच्या विशेष मार्गदर्शना खाली हि योजना राबविण्यात येत आहे.* व तसेच हदगांव नगर पालिकेतील दिव्यांगासाठी व शहर करीता नगर पालिकेतील संबंधित विभागाचे संगणक अभियंता शैलेजा पुजारी आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलीप बोरकर साहेब यांनी १००% दिव्यांग मित्र अॅप रजिस्ट्रेशन करुन माहिती व कागदपत्रे अपलोड केले आहे.

समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत पोहचविण्याची नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘दिव्यांग मित्र अॅप’ ची दिव्यांगाला फार मदत होईल, असा विश्वास दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व्यक्त केला.
दिव्यांग मित्र ॲपमध्ये दिव्यांग व्यक्तींना आपली नाव नोंदणी करुन विविध योजनांची माहिती त्यांना घेता येणार आहे. शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या विशेष सवलत व मदतीची माहिती या अॅपवरुन मिळणार आहे. शासनाकडुन पाठविण्यात आलेल्या वेळोवेळी सुचना अथवा संदेश या अॅप’द्वारे पाहता येतील. दिव्यांगानी या अॅप’द्वारे सोप्या पध्दतीने आपली नोंदणी करुन स्वत:चे नाव, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांकासह इतर माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती नोंदणी झाल्यावर ती अॅपच्या डॅशबोर्डवर दिसते. यामध्ये आर्थिक, वैयक्तिक माहिती, स्वत:ची कागदपत्रांच्या माहितीची नोंदणी करणे आवश्यक आहे. पुर्ण माहिती भरल्यानंतर समाजकल्याण अधिकारी सदर माहिती पडताळणी करुन अप्रु देतील.
दिव्यांग व्यक्तीची डॅशबोर्डवरुन बँकेची, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी माहिती घेतली जाते.
शासनाकडुन तात्काळ मदत दिली जाईल.दिव्यांग मित्र अॅपद्वारे अगदी सोप्या पद्धतीने स्वत:चे सेल्फी छायाचित्र, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, वयाचा दाखला आदि माहिती भरता येणे शक्य आहे. या अॅपद्वारे विविध योजनेची अंतर्गत मदत व सुविधा शासनाकडुन दिली जाऊ शकते. जिल्हा परिषदेकडुन दिव्यांग व्यक्तीला अॅपच्या माध्यमातून दिव्यांगाची यादी, शासकिय सुविधा व मदतीची विनंती यादी, शासकीय योजनेची यादी डॅशबोर्डवर पाहता येईल, अशी माहिती दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी दिली आहे. व तसेच या अॅपचा उपयोग नांदेड जिल्ह्यातील जास्तीस जास्त दिव्यांग व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन अॅप व्दारे शासकिय योजनांचा लाभ घरपोच घ्यावा. असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहे.त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, फारुख कुरैशी, रमेश गोडबोले, अहेमद भाई, बंडु पाटे, फहिमोदीन सरवरी, अंकुश कदम, अ. खलील खान, मारोती लांडगे, शेख इम्रान, सुरज राठोड, शेख गौस, शेख सलमा, धुरपत सुर्यवंशी, शबाना शेख, शेख सलीम, प्रियंका राठोड, शेख साजित, केशव वाठोरे, आकाश सोनुले, रतन कुरैशी, पवन गंधारे, महेश चव्हाण, कांचन वानखेडे ईत्यादी दिव्यांग व्यक्तीसह यावेळी उपस्थित होते…
दिव्यांग मित्र अॅपची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.appbell.nandeddiyang

*या अॅप करीता लागणारे ओरीजनल कागदपत्रे*
१.दिव्यांगाचे आॅन लाईन प्रमाणपत्र ( MH ) नंबर असलेले नविन प्रमाणपत्र ( स्मार्ट कार्ड)
२.आधार कार्ड
३.वयाचे प्रमाणपत्र ( टि.सी.)
४.बॅक पास बुक
५.कलर पास फोटो
६.ईतर कागदपत्रे.

*दिव्यांग विकास संघर्ष समितीची मागणी*
1.दिव्यांग मित्र अॅप करीता सर्व दिव्यांगाला स्मार्ट फोन द्यावा.
2.तलाठी व ग्राम सेवक मार्फत दिव्यांग मित्र अॅपचे प्रशिक्षण देऊन दिव्यांगाचे रजिस्ट्रेशन करुन दयावे.
3.दिव्यांग मिञ अॅप वरील योजनेत खासदार, आमदार व तसेच सर्व ग्रा.पं.,न.पा.,म.न.पा. यांची 5% दिव्यांग निधीची माहिती असावी.
4.दिव्यांग अॅप वरुन दिव्यांगाची प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे.
5.दिव्यांगाच्या रोजगार, घरकुल,व्यवसाय संबंधीत योजनेची अंमलबजावणी करावी.