अग्रणी सोशल फॉउंडेशनच्या वतीने शाळा प्रवेश दिन साजरा

135

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8नोव्हेंबर):-अग्रणी सोशल फौंडेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला.यावेळी विटा नं.पा.शाळा नं.१८ येथे शालेय वस्तू व खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी २४ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला.

कार्यक्रमात प्रथम मुख्याध्यापक सदाशिव चव्हाण यांनी स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन केले.त्यानंतर अग्रणी संस्थेच्या संचालिका सुहासिनी शिंदे, सल्लागार राजेंद्र सोनुले साहेब व वंचितचे शहराध्यक्ष सुरज तांबोळी यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.तर संस्थेचे सचिव मुनीर शिकलगार यांनी ७ नोव्हेंबरला सातारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेऊन इतिहास रचण्याची क्रांती याच दिवशी केली होती.

ज्यांना शिक्षणाविषयी खरे प्रेम आहे,त्यांनाच यांचे महत्त्व पटेल.असे बोलून शिकलगार यांनी तोच संदर्भ आजच्या काळात भटके विमुक्त जमातीला लागू होतो.भटक्या समाजात जर विकासक्रांती घडवायची असेल तर सर्वांनीच शिक्षण घेतले पाहिजे. त्यानंतर शालेय वस्तू व खाऊंचे वाटप करण्यात आले.शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता झाली.