प्रभारी तहसीलदार राणे यांना अवैध रेती व गौण खनिज उत्खनन प्रकरणी चौकशी करून बडतर्फ करा

265

🔹शिवसेना शहर प्रमुख तेजस पाटील नरवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

✒️महागाव,तालुका प्रतिनिधी(किशोर राऊत)

महागाव(दि.8नोव्हेंबर):-रेती व गौण खनिज माफियांना अभय देत आर्थिक देवाण घेवाण करीत रेती व गौण खनिज तस्करीला प्रोत्साहित करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावणाऱ्या प्रभारी तहसीलदार राणे यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी शिवसेना (उबाठा)शहर प्रमुख तेजस नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महागाव तालुक्यात महसुल विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे .प्रभारी तहसीलदार यांच्या कार्यकाळात महसुल विभागात मोठा रेती ,गौण खनिज घोटाळा झाल्याचा संशय असल्याने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळ यांनी तहसीलदार विश्वंभर राणे यांचा एक ते चार चा प्रस्ताव विभागीय आयुक्त अमरावती यांना पाठवला आहे.

परंतु संबंधित तहसीलदारांनी या कारवाईत तडजोड केल्याची जनतेत चर्चा आहे.राणे यांनी आपल्या प्रभाराच्या कार्यकाळात पैनगंगा नदी पात्रात अवैध पणे रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महागाव महसूल यंत्रणेला मिळाली होती.त्या आधारे महसूल पथकाने छापा टाकून ५ ट्रॅक्टर ताब्यात घेतले होते.परंतु कारवाई न करता प्रत्येकी ५० हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे अडीच लाख रुपये घेवून सोडून दिले व ट्रॅक्टर पळून गेल्याचा बेबनाव तयार केला.वास्तविक पाहता या प्रकरणात महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर जाणीवपूर्वक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोडून दिले.त्याबाबत वृत्तपत्रात बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत.

महागाव तालुक्यात मागील २ वर्षात अवैध रेती साठा जप्त दाखवून परस्पर निविदा बोलण्यात येवुन जप्त साठा नसताना रॉयल्टी देवून शासनाची फसवणूक करण्यात आली. अवैध रेती साठा नसताना रेती तस्करांच्या आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध रेती साठा दाखवून लिलाव घेण्यात आला.रेती साठा नसताना रॉयल्टी देवुन तस्करांना पैनगंगा नदी पात्रातुन रेती उत्खनन करण्याची मुभा देत अवैध रेती साठा असल्याचे सांगण्यात असल्याने ज्या ठिकाणी अवैध रेती साठा असल्याचे महसूल प्रभारी अधिकारी सांगत असल्याने ज्या ठिकाणी साठा होता त्या ठिकाणावरील शेजारील शेतकऱ्यांचे बयान घेण्यात यावे.बयाण घेतल्यास सर्व प्रकार उजेडात येईल,घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने ६५०रू.ब्रास याप्रमाणे पाच ब्रास रेतीचा परवाना देण्यात आला होता.

त्याकरिता रेती डेपो बनवुन त्या ठिकाणावरूनच रेती घ्यावयाचे बंधनकारक असताना मात्र प्रभारी तहसीलदारांनी रेती तस्करांना हाताशी धरून घरकुलाच्या नावावर ट्रॅक्टर चालकाला रेती तस्करी करण्यास पाठबळ दिले असल्याचे दिसुन येते , राणे यांच्या कार्यकाळात तालुक्यात मुरूम(गौण खनिज)उत्खनन करण्याची रॉयल्टी देण्यात आली देण्यात आलेली रॉयल्टी ही १०ते२०ब्रास दरम्यान ची असताना सदर रॉयल्टी देण्यात आलेल्या ठिकाणावरून २००ते३००ब्रास मुरूम उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांच्या महसुलांची बुडवणुक केल्या जात असताना तहसीलदारांनी मात्र केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या अवैध मुरूम उत्खनन करण्यास एक प्रकारे मुभाच दिली असल्याचे दिसत आहे त्यामुळे ज्या ठिकाणावरून मुरूम उत्खनन करण्यास रॉयल्टी देण्यात आली त्याठिकाण ची ईटीएस प्रणाली द्वारे मोजणी केल्यास हा प्रकार उघडकीस येईल ,तसेच रेती माफियांशी असलेले तहसीलदारांच्या आर्थिक संबंधाचे पुरावे हवे असल्यास त्यांच्या बँक अकाऊंट,फोन पे,गुगल पे खात्यांची चौकशी केल्यास सर्व पुरावे मिळतील त्यामुळे आपण वरील सर्व मुद्द्यांची सखोल व विशेष पथकामार्फत चौकशी करून केवळ स्वतःच्या आर्थिक लाभासाठी रेती तस्करी व गौण खनिज चोरीला पाठबळ देवुन शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या प्रभारी तहसिलदार यांच्यावर कारवाई करून त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे.अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलनं करण्याचा ईशारा शिवसेना (उबाठा)शहर प्रमुख तेजस पाटील नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

####

तहसीलदारांनी गौण खनिज तस्करीला पाठबळ दिल्याचे जिवंत पुरावे पाहिजे असल्यास जिल्हा प्रशासनाने महागाव तालुक्यातील सेवानगर येथील एका शेतातुन कमी रॉयल्टी देत जादा मुरूम उत्खनन केला असल्याने संबंधित ठिकाणी पाहणी करून ईटीएस प्रणाली द्वारे मोजणी केल्यास दिलेली रॉयल्टी व उत्खनन केला गेलेला मुरूम यामध्ये फार मोठी तफावत आढळून येईल यावरून प्रभारी तहसीलदारांच्या गौण खनिज तस्करांना अभय असल्याचे दिसुन येईल.
:-तेजस नरवाडे (शहर प्रमुख शिवसेना (उबाठा) महागाव)