

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.9नोव्हेंबर):-सामाजिक आर्थिक व जातनिहाय जनगणनेत ज्यांची नावे आहेत अशांसाठी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शहरातील नागरिकांसाठी केवायसी विशेष कॅम्पचे आयोजन नगर परिषदे समोर करण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान कार्ड नोंदणी करिता संपर्क करावा असे आवाहन नगरपरिषद प्रकल्प अधिकारी एम.जे.मोरे,वंदना परतवाघ व ऑपरेटर कृष्णा डांगे,आकाश कदम,सुदर्शन शिंदे, इत्यादींनी केले आहे.
2011 च्या जनगणनेच्या आधारे आयुष्यमान कार्ड बनवण्यात येत असून या आरोग्य कार्ड मधून 1356 रोगावर मोफत उपचारासाठी प्रति वर्षासाठी पाच लाख रुपयांचा विमा संरक्षण शासनामार्फत काढण्यात आलेला असल्यामुळे नागरिकांनी नगरपरिषद समोर येत असताना आधार लिंक असलेलेआधार कार्ड,पासपोर्ट फोटो,राशन कार्ड इत्यादी कागदपत्र घेऊन नगर परिषदे समोरील मोफत विशेष कॅम्पचा अवश्य लाभ घ्यावा. आयुष्यमानआरोग्य कार्डचा उपयोग करण्यासाठी शासनाच्या वतीने खाजगी रुग्णालयाची माहितीwww.jeevandayee.gov.in/www.pmjay.gov.in किंवा mob.18002332200 या वर संपर्क करावा.