वेल्हाणे येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

18

धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.29जुलै):-धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभू सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा युवा सेनेचे विभाग प्रमुख जयदीप लौखे-मराठे यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र माळी, उपविभागप्रमुख बादल सिंग पवार, सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल लौखे-मराठे, युवासैनिक कैलास माळी, राम मराठे, नितीन माळी, रोहित मराठे, ज्ञानेश्वर बोरसे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे विभागप्रमुख जयदिप लौखे-मराठे यांनी केले होते.