धरणगावात महात्मा बळीराजाची गौरव मिरवणुक… “ईडा पिडा टळो – बळीराजाचे राज्य येवो !… ” घोषणेने धरणगाव दणाणले !…

103

 

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील

धरणगांव – शहरामध्ये जगाचा पोशिंदा, “ईडा पिडा टळो – बळीराजाचे राज्य येवो” या घोषणेने शोभायात्रेतून लोककल्याणकारी राजा महात्मा बळीराजा यांना अभिवादन करण्यात आले. बलिप्रतिपदेच्या दिवशी लहान माळीवाडा येथून महात्मा बळीराजाच्या रॅलीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून शोभायात्रेची सुरुवात झाली.
यानंतर मोठा माळीवाडा परिसरात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि उषाताई वाघ यांनी सपत्नीक बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन केले. तद्नंतर धरणी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. पिल्लू मशिद, धनगर गल्ली, बस स्टँड मार्गे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवराय, लालबहादुर शास्त्री यांच्या स्मारकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सर्वात शेवटी साने पटांगण (बळीराजा चौक) येथे बैलगाडा रॅलीचा समारोप करण्यात आला.
समारोप कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पी.डी.पाटील यांनी लोककल्याणकारी बळीराजाच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, लहान माळी वाडा माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, कुणबी पाटील समाज अध्यक्ष भिमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदासजी विसावे, काँग्रेसचे युवा नेतृत्व रावसाहेब पाटील, जेष्ठ पत्रकार कडु महाजन, भरत चौधरी, धर्मराज मोरे, विनोद रोकडे, कमलाकर पाटील, स.फौ.मिलिंद सोनार, संजय सूर्यवंशी, पो.कॉ.विनोद संदानशिव, जेष्ठ नागरिक पंडीत गुरुजी, भिका चौधरी, नथा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते बळीराजाचे प्रतिमापूजन व नागरपूजन करण्यात आले.
बैलगाडी मिरवणुकीत सहभागी शेतकऱ्यांचा बागायती रुमाल, टोपी, महापुरुषांचे अनमोल ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये अमोल पाटील, भूषण पाटील, समाधान मराठे, गीताराम पावरा, शिवलाल बारेला यांचा समावेश होता. वाजंत्री च्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून फकिरा जाधव व त्यांचे सहकारी अजय चित्ते आणि कृष्णा जाधव यांचा तसेच पोलीस बांधवांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जगदंबा टेंट, राज ग्राफिक्स यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लक्ष्मणराव पाटील यांनी तर आभार हेमंत माळी यांनी मानले. लोककल्याणकारी बळीराजा शोभायात्रा यशस्वीतेसाठी लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, आबासाहेब राजेंद्र वाघ, हेमंत माळी, पी.डी. पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल पवार, आनंद पाटील, कैलास पवार, सुधाकर मोरे, गौतम गजरे, नामदेव मराठे आदींनी परिश्रम घेतले.