”19 नोव्हेंबर” गावा-गावात जागतिक शौचालय दिनाचे आयोजन

    126

     

    चंद्रपुर(प्रतिनिधी) – दर वर्षी ”19 नोव्हेंबर ” हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. त्यानुसार 19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.

    स्वच्छतेचे जिवनात फ़ार महत्व असुन,स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी असल्यास 80 टक्के आजार नाहिसे होतात. याचाच एक भाग म्हणुन , गावस्तरावर स्वच्छते विषयी गाव स्तरावर जनजागरण व्हावे व प्रत्येकाला स्वच्छतेचे मह्त्व कळावे. यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस जगात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. चंद्रपुर जिल्हा शाश्वत स्वच्छते च्या अनुषंगाने मार्गक्रमण करित असुन, जिल्हातील गावा-गावात शौचालय दिनाचे आयोजन करुन, सभा,गृहभेटी, लोककलावंताचे कार्यक्रम, स्वच्छता फ़ेरी, मार्गदर्शन सभा अशा विविध कार्यक्रमा द्वारा गावस्तरावर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन, जनमानसाच्या मना-मनात स्वच्छतेचे मह्त्व वृध्दीगत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने 19 नोव्हेंबर ला जागतिक शौचालय दिनाचे गावस्तरावर भव्य आयोजन करुन, गावस्तरावर विविध उपक्रमातुन ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छते विषयी अभिप्रेरित करावे. असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.
    ——
    शौचालय दिनाला जागतीक पातळीवर महत्व प्राप्त झालेले असुन, सुरक्षित आरोग्या करीता स्वच्छता खुप महत्वाची आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावा – गावात शाश्वत स्वच्छता निर्माण होण्यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक कर्तव्य म्हणुन समोर यावे.

    -विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर.