वरोऱ्याची सृष्टी चट्टे महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात.

44

 

खेमचंद नेरकर, विशेष प्रतिनिधी, मो.96659 41942

वरोरा- लोक शिक्षण संस्था, वरोडा व लोकमान्य कन्या विद्यालय, वरोराची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी मोहन चट्टे हिची भुवनेश्वर, ओडीसा येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र मुलींच्या राज्य संघात उत्कृष्ट खेळाच्या आधारे निवड झालेली आहे. सृष्टी ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून नुकत्याच वर्धा येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. तिच्या निवडीबद्दल वरोरा शहरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे . लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्णजी घड्याळपाटील , कार्यवाह श्री विश्वनाथ जोशी, कार्यवाह ऍड. दुष्यंत देशपांडे, मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री प्रशांत दोंदल यांनी सृष्टीचे अभिनंदन केले.
सृष्टी हिने आपल्या यशाचे श्रेय दुष्यंत लांडगे, गणेश मुसळे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, निखिल बोबडे , राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके, पालक, तथा वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोराच्या ज्येष्ठ खेळाडूंना दिले.